मार्च महिन्यापासून अति महत्वाचे सोडून न्यायमन्दिरे बंद असल्याने ज्युनिअर वकीलावर उपासमारीची वेळ आली असल्याने आता मंदिराच्या बरोबरीने न्याय मंदिरेही सुरू करण्यात यावी या मागणी साठी आज जिल्हा व सत्र न्यायालयासमोर वकिलांनी आंदोलन केले.
मार्च-2020 पासून अति महत्वाचे प्रकरण वगळता कोरोनामुळे न्यायमंदिरे बंद करण्यात आली आहे. यामुळे वकीलावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना आता वकिलांनी देखील न्यायमंदिरे सुरू करण्यात यावी या मागणी साठी आज जिल्हा व सत्र न्यायालयासमोर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. बार कौन्सिल कडून देण्यात आलेले अन्नधान्याचे किटची मदतही तुटपुंजी आहे. आहे. वकिलांना इतर व्यवसाय करता येत नसल्याने वकिलांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले परिणामी वकील आत्महत्या सारखा पर्याय निवडत आहे लवकरात लवकर न्यायमन्दिरे सुरू करावी अशी मागणी यावेळी अॅड. राकेश कुलकर्णी यांनी केली.